एक मागणे

शक्यतांचे दान नको रे स्थिर नात्याचा शाप दे ह्या अनोळखी गर्दी मध्ये एक तरी नवा मित्र दे

काय करु शान पसारा बस थोडासाच मान दे फार जागले दिन आता ह्या दीनास शांत रात्र दे

नको कैक पाहुणे दारी अंतरीचा सहचारी दे श्वेत रात्रींचा विलास ना आर्त स्वप्ना प्रतिसाद दे

शे शृंगारिक शब्दांपेक्षा साधे भिडणारे वाक्य दे अनेकाविध छंद नको मज एक उत्कट वेड दे अशे कोट आस ना मज बस शोधण्याचा ध्यास दे

हा पांगळा विश्वास नको द्यायचा तर नकार दे परखड आणि स्पष्ट दे