चातक आणि पाऊस

उशिरानेच आला तसा पहिला पाऊस थोडा घेऊन रिमझिम नाद अन् हिरवळीचा सडा फुललेला आसमंत अन् अंकूरलेले वावर दुष्काळी चातकाच्या मनास पडे ना आवर

रिमझिम नाद अन् मातीचा सुगंध का न करणार हा पावसाळा मती मंद

आस लावून ह्या वेडया मनी लवकरच रुसून कुठे गेलास आणि गायब का झालास निन्योसाठी तुझ्या? ह्या चातकास केवळ पापण्यांत पाणी

ठेवून कोमेजलेले अंकुर झालास तू फरार चातकानेही केला अखेर कोरडेपणाशी करार

घेऊन थोडी विश्रांती त्याने पुन्हा दिली साद भेगाळलेल्या धरणीला पुन्हा लावली आस मनसोक्त बरसण्याचा न घेता त्रास साद देऊनही का चातकाचा हा उपहास का हा केवळ परतण्याचा भास?