संदिप खरेंची माफी मागून सादर करीतो
#विडंबन प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी (भोंदू)बाबा प्रत्येकाच्या डोक्यावरती घेतला त्याने ताबा प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठली तरी चिंता प्रत्येकाच्या डोक्यामध्ये कसला तरी गुंंता प्रत्येकाच्या पत्रामध्ये दोषारोप नशीबा
प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ओसंडून भक्ती प्रत्येकाच्या प्रश्नावर लगेच यांची उक्ती प्रत्येकाच्या व्याधींकरता यांच्याकडे थांबा
प्रत्येकाच्या आश्रमी उत्पादनांची जंत्री प्रत्येकाच्या खिशाला स्वतःहून कात्री प्रत्येकाच्या तर्कावर यांच्या उलट्या बोंबा
फिटावेत जर तरी शब्दांचे देणे एक तरी विडंबन असे लिहावे बहाणे प्रत्येकाच्या पानी कशी विशुद्ध प्रतिभा?