SAMwad (सम-वाद)

विडंबन

माफीनामा तयार आहे गेल्या वर्षी ह्यासुमारासचं ह्या कवितेचा डोक्यात खेळ सुरू होता, दोन कडवे तयारही केले होते पण ईतर अनेक गोष्टींसारखे तेही मागे पडले ते पडलेच. शेवटी आज सावरकर माध्यमांत दिसले आणि हे पुर्ण करण्याची आठवण झाली. संपवू एकदाचं म्हणून शेवटचं कडवं तस काही विशेष जमलेलं नाही. असो, तसही वेळ निघून गेल्याने प्रासंगिकतेचे मूल्यही राहीले नाहीच.

#विडंबन घसा खवखवला

ने मजसी ने परत वर्षावारीला अजितदा प्राण तळमळला खूर्चीचे चरणतला तुज धुता मी नित्य पाहिला होता मज वदलासी प्रातः समयीच जाऊ राजभवनी घास हा घेऊ तै अमृताहृद विरहशंकितही झाले परि तूवा वचन तिज दिधले काकांसी स्वये मीच घोडे लावीन आमदारही फोडीन विश्वसलो तुज ह्या शब्दी मी न विचार करता गजनी मी तव सशक्त आकडा घेउनी त्वरे येईन बोलिला तिजला

लक्षे पंधरा वा जलयुक्त शिवारे जैशी ही फसगत झाली तैशी सत्ताविरह कसा साहू या पुढती माध्यमंही साहेबमय होती नाईकविखे वेचियली या भावे की त्यांनाही अच्छे दिन यावे जरी उद्धवा व्यत्यये आणिला हा व्यर्थ भार राणेचा ती कोटयेवृक्षतपासिता रे नव युगुलगीता किनारी सरिता रे तो बुलेट प्रकल्पही आता रे मज नाणार म्हणुनी गेला

पक्षि नेते बहु बहुजनी, एक परि प्यारा मीच संघभूमिचा तारा मातोश्री इथे भव्य, परि पुज्य भागवती माहेरची माणसेच मोती तिजविण नको राज्य, नच सामना वाघाचा मज प्रियवास जरी भ्रष्टांचा दंगलीही व्यर्थ ह्या आता रे बहू भिडे मनोहरी सत्ता रे तुज शिखर संचिता जी सिंचता रे तद्विरहाची इडी घालितो तुजला

या अर्धकेशे हससि निर्दया कैसा, का शब्द मोडिसी ऐसा त्वस्वामित्वा सांप्रत जी मिरविते भिऊनी का बारामतीते मन्संघाला सांप्रदायिक म्हणून फसविशी मज द्विजाला दोन दिवसची देशी तरि काकाखालच्या मांजरा रे फाटकी न मजपक्षाची झोळी रे कथिल हे माफीवीरास आता रे जो नथुहस्ती हे राम करवेल तुजला

#विडंबन

पाडगावकरांना वंदन करून -

त्याने बीफ खाल्लं किंवा तिने पॉर्क खाल्लं खाऊ दे की मला सांगा त्यात तुमचं काय गेलं?

तो फार धावपळीत बेकन घेऊन आला घरी येताच लगेच चुलीशी खेटला लाल लाल निखाऱ्यावर बारबेक्यू पेटला खेटला तर खेटू दे की पेटला तर पेटू दे की! तुमच बुड कशासाठी इतकं गरम झालं

त्याने बीफ खाल्लं किंवा तिने पॉर्क खाल्लं खाऊ दे की मला सांगा त्यात तुमचं काय गेलं?

एकदा ती त्याच्यासाठी बिफ घेऊन आली श्रावण होता तरी भिजत त्याच्या घरी गेली, घरात तेव्हां कोणीच नव्हतं लगेच किचन गाठलं तिला फोडणी द्यायला सांगून त्याने चक्क कूकर लावलं, लावलं तर लावू दे की शिजलं तर शिजू दे की तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं ?

त्याने बीफ खाल्लं किंवा तिने पॉर्क खाल्लं खाऊ दे की मला सांगा त्यात तुमचं काय गेलं?

भाज्यांत नसतात प्रथिने सारी मग असेलचं कि पोषणावर नयन, ते थोडेच खाणार आहेत सपक पातळ वरण, दुखत असतील तुमच्या भावना तर वेद देतील की मलम खाल्ले तर खाऊ दे की व्हायचे ते होऊ दे की तुमच्या घरचं तेल त्याने थोडंच उचलून नेलं ?

त्याने बीफ खाल्लं किंवा तिने पॉर्क खाल्लं खाऊ दे की मला सांगा त्यात तुमचं काय गेलं?